बरेच दिवस मराठीत काही लिहिलं गेलं नव्हतं. बस मधून येता-जाताना, मनात अनेक विचार येत असतात. त्यातच एक दिवस, अण्णांची आणि मुख्यतः ते देवाला हार म्हणून वाहायचे त्या गजर्यांची आठवण झाली. त्याच
विचाराची चटकन झाली कविता,ती म्हणजे निर्माल्य.
मी आज काल स्वतः च्या कविते बरोबर प्रयोग करावा म्हणून, एकाच कवितेचे दोन वेगळे शेवट लिहितो. कदाचित माझ्याच मनाचे दोन पैलू त्यातून उलगडतात. 'निर्माल्य' ह्या कविते बरोबर सुद्धा असा प्रयोग करून पाहिला.
मी आज काल स्वतः च्या कविते बरोबर प्रयोग करावा म्हणून, एकाच कवितेचे दोन वेगळे शेवट लिहितो. कदाचित माझ्याच मनाचे दोन पैलू त्यातून उलगडतात. 'निर्माल्य' ह्या कविते बरोबर सुद्धा असा प्रयोग करून पाहिला.
काही जणांना ही कविता आवडली नाही, जे ही ठीक आहे, माझी प्रत्येक कविता, प्रत्येक वेळी, प्रत्येकाला आवडेलच असं नाही. काहींना डावी कडचा शेवट आवडला, काहींना उजवी कडचा. काहींनी सांगितलं की ही कविता अजून अपूर्ण, raw आणि unfinished वाटते.
थोडा अजून विचार केला ह्या सगळ्या बद्दल आणि नंतर जाणवलं की दोन शेवट मुळात वेगळे नाही आहेत. त्यातून निर्माण झाली, 'निर्माल्य' ची एक नवीन आवृत्ती, ती काही अशी.
निर्माल्य
तुला
आवडतात म्हणून,
मी ओंजळ भर सोनचाफे
आणि मोगर्याचे गजरे आणले होते
तुझ्या बरोबर त्यांचा ही घमघमाट,
मी ओंजळ भर सोनचाफे
आणि मोगर्याचे गजरे आणले होते
तुझ्या बरोबर त्यांचा ही घमघमाट,
घर भर
दरवळला,
सुखाने नांदला काही दिवस
सुखाने नांदला काही दिवस
पण तू
जाताना...
चाफा आणि गजरे,
माळून गेली नाहीस.
चाफा आणि गजरे,
माळून गेली नाहीस.
काही
दिवस ते थांबले,
शेवटी हिरमुसून,
पार कोमेजून गेले
शेवटी हिरमुसून,
पार कोमेजून गेले
ते मला
टाकवत नाहीत,
निर्माल्य
टाकत नाही ना,
तसंच
तसंच
तुझी
मागे राहिलेली,
आठवण-स्वप्ने आहेत काही,
तशीच अर्ध-गंधीत,
अर्ध-मेलेली
आठवण-स्वप्ने आहेत काही,
तशीच अर्ध-गंधीत,
अर्ध-मेलेली
मी मानतो म्हणून ते निर्माल्य,
तू नाही मानलस म्हणून, कचरा
तरी ही कचरा म्हणून,
ते टाकवत नाही
पण मी
गेलो,
की माझ्या बरोबर होईल,
की माझ्या बरोबर होईल,
निर्माल्याचं,
विसर्जन !
विसर्जन !
- प्रतीक
5/7/2014
5/7/2014



